ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर ही तिच्या अभिनयामुळे आणि तिच्या ड्रेसिंग सेन्समुळे नेहमीच चर्चेत असते. सईने मराठी चित्रपट सृष्टीसोबत बॉलीवूडमध्येही आपली एक विशिष्ट ओळख निर्माण केली आहे. सईच्या कामासह चर्चा असते ती तिच्या फोटोशूटची.
सईने नुकतेच निळ्या रंगाच्या स्टनिंग आऊटफिटमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. यात ती कमालीची सुंदर दिसत आहे.
यावेळी तिने क्रॉप टॉप त्यावर ब्लेझर आणि प्रिंटेड प्लाझो पॅंट असा परफेक्ट आऊसफिट परिधान केलाय.
या आऊटफिटवर सईने गळ्यात एक सिंपल चैन परिधान केली आहे. यासोबतच सिंपल मेकअप लूकही केला आहे.
सई नेहमीच हटके लूक क्रिएट करत असते. सध्या तिच्या या लूकचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.