करिनाने दिली गोड बातमी, दुसऱ्यांदा होणार आई !

1009

सेलिब्रेटी कपल्स सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी चाहत्यांना नुकतीच एक गोड बातमी दिली आहे. करिना दुसऱ्यांदा आई होणार असून खान कुटूंबियांना आता नव्या पाहूण्याच्या आगमनाची चाहूल लागली आहे. वयात दहा वर्षांचे अंतर असलेल्या सैफ आणि करिना यांनी 16 ऑक्टोबर 2012 मध्ये विवाह केला होता. त्यांना तैमूर हा मुलगा असून लोकप्रिय स्टारकिड्स म्हणून तो ओळखला जातो. ‘आमच्या कुटूंबात नवा पाहूणा येणार आहे. हे जाहीर करताना आम्हाला आनंद होतोय. आमच्यावर प्रेम करणाऱया हितचिंतकांचे आभार’ असा संदेश सैफ आणि करिनाने सोशल मिडियावरून दिला आहे. आगामी काळात करिना आमीरसोबत ‘लाल सिंग चड्ढा’ सिनेमात झळकणार आहे. हा सिनेमा पुढच्या वर्षी ख्रिसमसला प्रदर्शित होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या