सैफ-करीनाच्या घरी पुन्हा पाळणा हलणार, चाहत्यांचा शुभेच्छांचा वर्षाव

1640

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अभिनेत्री करीना कपूर-खान (Kareena Kapoor Khan) यांच्या घरी पुन्हा पाळणा हलणार असून नव्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. करीना दुसऱ्यांना आई होणार असून खुद्द सैफ व करीनाने याबाबत माहिती दिली. ‘पिंकव्हीला’ने याबाबत वृत्त दिले आहे.

आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आमच्या कुटुंबात आणखी एक चिमुकला पाहुणा येणार आहे. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांसाठी आणि प्रेमासाठी खूप धन्यवाद, असे सैफ आणि करीनाने म्हटले आहे. ही खुशखबर दिल्यानंतर दोघांवर सोशल मिडियाद्वारे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. करीना हिचे वडील रणधीर कपूर यांनीही यावर प्रतिक्रिया दिलो असून ‘दोन मुलं कधीही चांगली’, असे म्हटले आहे.

सैफ अली खान याची बहीण आणि अभिनेत्री सोहा अली खान हिनेही इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत. ‘मी स्वतःला रोखू शकले नाही, शुभेच्छा. सुरक्षित आणि चांगले आरोग्य राहू दे आणि नेहमीप्रमाणे आनंदी रहा’, अशी पोस्ट सोहा अली खान हिने केली.

screenshot_2020-08-12-17-25-19-660_com-facebook-katana

दरम्यान, सैफ आणि करीना यांचे 2012 ला लग्न झाले होते आणि त्यांना तैमुर नावाचा मुलगाही आहे. आता ती दुसऱ्यांदा आई होणार असून सोशल मीडियावर दोघांना शुभेच्छा मिळत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या