करिना कपूर फेब्रुवारी महिन्यात बाळाला जन्म देणार

करिना कपूर व सैफ अली खान हे दुसऱ्यांदा आई वडिल होणार आहेत. करिनाला नववा महिना लागला असून ती फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्या बाळाला जन्म देणार आहे. सैफ अली खान याने स्वत: याबाबत ही माहिती दिली आहे.

kareena2

”फेब्रुवारी महिन्यात कधीही आमचं बाळ जन्माला येऊ शकतं. सध्या मी आणि करिना दोघंही आरामात राहत आहोत. पण कधी कधी खूप भीती वाटते की आम्ही बाळाची एवढी मोठी जबाबदारी कशी पार पाडू’, असे सैफ अली खानने एका मुलाखतीत सांगितले आहे.

kareena

करिना कपूर लवकरच दुसऱ्यांदा आई होणार आहे. प्रेग्नेंसीच्या शेवटच्या दिवसात देखील ती स्वत:ची भरपूर काळजी घेत आहे. डाएटसोबत वर्कआउट, एक्सरसाइज आणि योगासन देखील करत आहे. प्रेग्नेंसीच्या काळात योग करतानाचे काही फोटो तिने शेअर केले होते. एका प्रमोशनल फोटोशूटवेळी तिने योगा पोज दिल्या आहेत. यामध्ये करिना ब्लॅक वर्कआउट आउटफ‍िट मध्ये वेगवेगळी योगासन करताना दिसतेय.

गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात सैफ आणि करिनाने ‘सेकंड बेबी’ची घोषणा केली होती. याआधी सैफ आणि करिनाला तैमूर नावाचा मुलगा आहे. ‘तैमूर’ हा सेलिब्रिटी बेबी ठरला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या