घरी बोलवून अश्लील व्हिडीओ बनवला! संताने केला तरुणीवर आरोप

1836

आपल्याला घरी बोलवून जबरदस्तीने आपला अश्लील व्हिडीओ बनवल्याचा आरोप एका संताने तरुणीवर केला आहे. अश्लील व्हिडीओ बनवल्यानंतर तरुणी आणि तिच्या कुटुंबीयांनी ब्लॅकमेल केल्याचीही तक्रार त्याने केली आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, राजस्थानच्या बाडमेर येथे हा संत राहतो. त्याचा इथे एक आश्रम असून ही तरुणी त्याच्या आश्रमात येत असे. दोन दिवसांपूर्वी हा संत औषध घेण्यासाठी बाडमेरहून जोधपूर येथे आला होता. या तरुणीला ही बाब समजल्यानंतर तिने मोबाईलद्वारे त्याच्याशी संपर्क साधला आणि त्याला घरी उपाहारासाठी बोलावलं. तरुणीच्या निमंत्रणावरून संत तिच्या घरी गेला. तिथे तरुणी त्याला तिच्या खोलीत घेऊन गेली. खोलीत तिचे कुटुंबीय आधीच उपस्थित होते. त्यांनी मिळून त्याला बिअर देऊ केली. मात्र, त्याने नकार देताच त्याच्यावर बिअर पिण्याची जबरदस्ती करू लागले.

संताने केलेल्या आरोपांनुसार, तरुणीच्या घरच्यांनी त्याचे कपडे फाडले, तरुणीने त्याच्यासोबत अश्लील व्हिडीओ बनवला आणि त्यानंतर त्या व्हिडीओच्या बदल्यात त्याच्याकडून 10 लाख रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीही दिल्याचा आरोप संताने केला आहे. या प्रकरणी जोधपूर पोलीस स्टेशनमध्ये या तरुणीविरोधात आणि तिच्या कुटुंबीयांविरोधात तक्रार नोंदवण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

आपली प्रतिक्रिया द्या