रोमॅण्टिक हीरो साकारताना टेन्शन आलं!

सैराटमध्ये बाळ्याची भूमिका साकारणारा अभिनेता तानाजी गळगुंडे आता टॉकीज ओरिजनल चित्रपट ‘गस्त’ मधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. यात तो पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसणार आहे. याबाबत तानाजी म्हणतो, ‘मला थोडंसं दडपण आलं होतं. कारण याआधी मी सहायक आणि विनोदी भूमिका केल्या होत्या. गस्तमध्ये प्रमुख नायकाची भूमिका असल्यामुळे थोडी धाकधूक होती.

रोमँटिक नायकाची भूमिका साकारायची या सगळ्याच थोडं टेन्शन होतं. पण दिग्दर्शक आणि गस्तच्या टीमने मला खूप सपोर्ट केला. ‘गस्त’मध्ये तानाजी अमर नावाच्या मुलाची भूमिका साकारतोय. तो सुजाताच्या प्रेमात आहे. त्यांची प्रेमकथा पुढे काय वळण घेते हे चित्रपटात पाहायला मिळेल.

आपली प्रतिक्रिया द्या