साकिनाका सिलिंडर स्फोट, आणखी एका मुलीचा मृत्यू

साकिनाका येथे मंगळवारी गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घटनेतील 14 वर्षांच्या जखमी मुलीचा आज सकाळी कस्तुरबा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या चार झाली आहे. दरम्यान, जखमींपैकी उर्वरित दोघे अत्यवस्थ आहेत.

साकिनाका येथील जरीमरी जगताप इस्टेट बाजूला असलेल्या जगतापवाडीतील अनंत भुवन चाळीत मंगळवारी पावणेदहाच्या सुमाराला एका घरात सिलिंडरचा स्पह्ट झाला होता. या स्पह्टात आतापर्यंत अलमस (15), अस्मा (60) आणि रिहान (8) यांचा मृत्यू झाला तर आज सकाळी कस्तुरबा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या सानिया (14) या मुलीचा मृत्यू झाला. दरम्यान, अनिस खान (45) यांच्यावर कस्तुरबा तर शिफा (16) हिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या