#DhoniRetiers टॉप ट्रेंड, साक्षीने ट्विट उडवल्याने सस्पेन्स वाढला

1382
टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी पत्नी आणि मित्र-मैत्रीणींसह सुट्टीचा आनंद घेत आहे.

हिंदुस्थानच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चा काही थांबत नाहीत. बुधवारी रात्री धोनीच्या निवृत्ती संदर्भातली बातमी ट्विटरवर अचानक ट्रेंड होऊ लागली. #DhoniRetiers टॉप ट्रेंड गाठला. लॉकडाऊन दरम्यान टीम इंडियाचा माजी कर्णधार क्रिकेटला रामराम करेल असे वाटत होते. धोनीची पत्नी साक्षीने पुढे येत धोनीच्या निवृत्तीची बातमी देणाऱ्या लोकांना योग्य प्रत्युत्तर दिले. पण काही वेळातच साक्षीने हे हँडलवरील ट्विट डिलीट केले. यामागचे कारण काय आहे हे अजून स्पष्ट झालेले नाही. मात्र, धोनीच्या निवृत्तीबाबतचे सस्पेन्स वाढले आहे.

गेल्या वर्षी जुलैमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड कप उपांत्य फेरीनंतर धोनी कोणताही सामना खेळलेला नाही. तेव्हापासून क्रिकेट विश्वात त्याच्या कारकिर्दीविषयी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

साक्षीने ही सर्व बातमी खोटी असल्याचे सांगितले. धोनीच्या निवृत्तीबद्दल अफवा दूर करताना तिने कडक शब्दांत नेटकाऱ्यांना सुनावले. साक्षीने ट्विट केले की, ‘ही केवळ अफवा आहे! मी समजू शकते की लॉकडाऊनने लोकांना मानसिकरित्या अस्थिर केले आहे! #DhoniRetiers वाल्यांनो जा, आपले काम करा.’

screenshot_20200528-121858_chrome_copy_700x450

साक्षीच्या या ट्विटवर लोकांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या. मात्र त्या नंतर तिने अचानक ते ट्विट डिलिट केले. त्यामुळे लोकांचा संभ्रम वाढला.

आपली प्रतिक्रिया द्या