साक्षी महाराजांनी केले बार-नाइट क्लबचे उद्घाटन

37

सामना ऑनलाईन । लखनौ

उन्नावचे भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी लखनौमधील एका ‘बार आणि नाइट क्लब’चे उद्घाटन केल्याचे समोर आले आहे. महाराज यांच्या या कृतीने उत्तर प्रदेशात भाजप अडचणीत आले आहे.

हॉटेलच्या उद्घाटनाचे निमंत्रण मला उत्तर प्रदेश भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष राज्जन सिंग यांनी दिले. हे हॉटेल त्यांच्या जावयाचे आहे. यानुसार मी येथील अलिगंज भागातील या हॉटेलचे उद्घाटन केले. पण नंतर हा एक बार आणि नाइट क्लब असल्याचे मला आढळून आले आहे, असे साक्षी महाराज यांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणी खोटी माहिती देऊन माझी फसवणूक केल्याबद्दल भाजप प्रदेशाध्यक्षांवर कारवाई करा, अशी मागणी साक्षी महाराज यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष महेंद्रनाथ पांडे यांच्याकडे केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या