साक्षी मलिक जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर

32

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

रिओ ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानला पदक मिळवून देणाऱ्या महिला कुस्तीपटू साक्षी मलिकने पुन्हा एकदा दमदार कामगिरी केली आहे. जागतिक कुस्ती महासंघाने नुकत्याच जाहीर केलेल्या क्रमवारीत साक्षी पाचव्या स्थानावर झेपावली आहे. साक्षीने ५८ किलो वजनी गटात खेळताना सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. रिओ ऑलिम्पिकमध्ये याच दमदार कामगिरीच्या जोरावर साक्षीने हिंदुस्थानाला कुस्तीत पदक मिळवून दिलं होतं. हिंदुस्थानला कुस्तीत पदक मिळवून देणारी साक्षी ही पहिली महिला ठरली होती. या कामगिरीमुळेच साक्षीने जागतिक क्रमवारीत पाचवं स्थान पटकावलं आहे.

महिला कुस्तीपटूंच्या क्रमवारीत जपानची काओपी इचो ही अव्वल स्थानावर आहे. तर,पुरुषांमध्ये ५७ किलो वजनी गटामध्ये भारताच्या संदीप तोमरने अव्वल दहा कुस्तीपटूंमध्ये प्रवेश केला आहे. या गटामध्ये जॉर्जियाच्या व्लादिमीर के. याने अव्वल स्थान पटकावले आहे. सध्याच्या घडीला साक्षी आणि संदीप हे दोघेही आशियाई अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेची तयारी करत आहेत. ही स्पर्धा १०-१४ मे या कालावधीमध्ये होणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या