IPL 2020 – कोटीच्या कोटी उड्डाणे, आयपीएलमधील कर्णधारांचे मानधन ऐकाल तर व्हाल थक्क

आयपीएलच्या तेराव्या मोसमाला यूएईमध्ये शनिवारपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेसाठी खेळाडूंवर संघमालकांकडून लाखो करोडोची बोली लावली जाते. संघातील खेळाडूंसाठी कोट्यवधीची बोली लावणारे संघ मालक कर्णधारांना किती मानधन देतात ते आपण पाहूया

विराट कोहली –

rcb-virat-kohli

रॉयल चँलेंजर्स बंगळुरुने विराट कोहलीला तब्बल 17 कोटींचे मानधन दिले आहे. आरसीबीने सतरा कोटी मोजून विराटला त्यांच्या संघात कायम ठेवले. सर्वात मोठी बोलीचा आकडा 15 कोटी असताना आरसीबीने विराटला 17 कोटी दिले आहेत. विराट कोहली हा आतापर्यंत प्रत्येक सिझनमध्ये आरसीबीकडूनच खेळला आहे. हे त्याचे आरसीबीचा कर्णधार म्हणून आठवे सिझन आहे. एवढी मोठी रक्कम मोजूनही आरसीबीला अद्याप एकदाही आयपीएलचे विजेतेपद पटकावता आले नाही

रोहीत शर्मा –

rohit-sharma

रोहीत शर्माला मुंबई इंडियन्सने 15 कोटींचे मानधन दिले आहे. रोहीत सलग चार वर्ष मुंबई इंडियन्सचा कर्णधार असून त्याच्या कप्तानीत संघाने दोनदा विजेतेपद पटकावले आहे. रोहीत 2011 पासून मुंबई इंडियन्ससाठी खेळत आहे.

महेंद्रसिंग धोनी

dhoni4

यशस्वी कर्णधार असलेला महेंद्र सिंग धोनीला संघात ठेवण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्जने तब्बल 15 कोटी मोजले आहेत. धोनीच्या कप्तानीत संघ आठ वेळा खेळला असून तीन वेळा विजेतेपद पटकावले आहे.

स्टीव्ह स्मिथ –

steve-smith-1

राजस्थान रॉयल्सने स्टीव्ह स्मिथला संघात ठेवण्यासाठी 12 कोटी ंमानधन दिले आहे. 2018 मध्ये एक वर्षाच्या बंदीमुळे स्टीव्हला आयपीएल खेळता आले नव्हते. मात्र 2019 च्या आयपीएलमध्ये तो अर्ध्या सिझननंतर संघात सामिल झाला होता.

डेव्हिड वॉर्नर

david-warner
ऑस्ट्रेलियाचा खेळाडू डेव्हिड वॉर्नर हा पहिल्यांदाच हैदराबाद संघाचा कर्णधार झाला आहे. त्यासाठी संघाने 12 कोटी मोजले आहेत. गेल्या वर्षी वॉर्नर केन विलियमसन्सच्या कप्तानीत खेळला होता.

केएल राहुल –

k-l-rahul-punjab-new

किंग्ज इलेव्हन पंजाब या संघाने राहुलला 11 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. लिलावात राहुलवर चार संघमालकांची नजर होती मात्र 11 कोटींची बोली लावून पंजाबने त्यााल खरेदी केले.

दिनेश कार्तिक –

dinesh-kartik

कोलकाता नाईट रायडर्सचे कर्णधारपद रॉबिन उत्थपाला कडे जाणार असे ठरले होते. मात्र नंतर कर्णधार पद दिनेश कार्तीकला सोपविण्यात आले. दिनेशला कोलकाताने 7.4 कोटीला खरेदी केले आहे.

श्रेयस अय्यर –

shryas-iyer-shreyas-aiyyar

दिल्लीने श्रेयस अय्यरला कर्णधार केल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण ते पद रिषभ पंतकडे जाण्याची चर्चा होती. मात्र 7 कोटींना विकत घेतलेल्या श्रेयसकडे संघाने कर्णधार पदाची धुरा सोपवली.

आपली प्रतिक्रिया द्या