नक्षलग्रस्त भागात काम करणार्‍या पोलिसांना दीडपट वेतन मिळणार

23
प्रातिनिधीक फोटो

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्यात नक्षलग्रस्त गडचिरोली, अहेरी, गोंदियामध्ये काम करणार्‍या पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांवर गणपती बाप्पा प्रसन्न झाले आहेत. कारण अतिसंवेदनशील भागात जिवावर उदार होऊन काम करणार्‍या या पोलिसांना दीडपट वेतन व महागाई भत्ता देण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाने आज घेतला आहे.

नक्षलग्रस्त गडचिरोली, अहेरी, गोंदिया जिह्यातील अतिसंवेदनशील क्षेत्रात कार्यरत असलेले राज्य राखीव पोलीस दल, बिनतारी संदेश विभाग, मोटार परिवहन विभाग, गुन्हे अन्वेषण विभाग, वाहतूक विभाग, विशेष कृती दल, नक्षलविरोधी अभियान, राज्य गुप्तवार्ता विभागातील पोलीस अधिकारी कर्मचार्‍यांना त्यांना मिळणार्‍या मूळ वेतनाच्या दीडपट वेतन व महागाई भत्ता (डीए) देण्यात येणार आहे. या भागात जोपर्यत पोलीस काम  1 एप्रिल 2018 ते 31 मार्चपर्यंतच्या कालावधीत वाढीव वेतनाचे फायदे संवेदनशील भागांत काम करणार्‍या पोलिसांना देण्यात येतील.

आपली प्रतिक्रिया द्या