जिल्हा परिषदेच्या रुग्णवाहिकेवर काम करणाऱ्या 56 चालकांना गेल्या चार महिन्यांपासून पगाराची फुटकी कवडीही मिळाली नाही. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाच्या या गलथान कारभाराचा निषेध करण्यासाठी संतप्त चालकांनी पालघर जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातच बेमुदत अर्धनग्न आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत खात्यात पगाराची पूर्ण रक्कम जमा होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा दिल्याने प्रशासनाची पळापळ उडाली आहे
102 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेच्या चालकाचे कंत्राट मे. गरुडझेप ठेकेदाराला देण्यात आले आहे. गेल्या 15 वर्षांपासून हे चालक कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. आधीच तुंटपुजा पगार तोही वेळेवर मिळत नसल्याने चालकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. ठेकेदाराने 2022 पासून रुग्णवाहिका चालकांचा पी. एफ. भरलेला नाही. त्यामुळे चार महिन्यांपासून या चालकांचा पगार रखडला आहे. संतप्त चालकांनी जिल्हा शल्यचिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा पत्रव्यवहार करून ही बाब त्यांच्या लक्षात आणून दिली. मात्र याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला जात नसल्याने संतप्त रुग्णवाहिका चालकांनी अर्धनग्न आंदोलनाचा पवित्रा हाती घेतला. आधी आमच्या मागण्या मान्य करून पगार खात्यात जमा करा, मगच हे आंदोलन मागे घेऊ, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे
ठेकेदार फरार
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. रामदास मराड यांच्या कार्यालयात पगाराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र त्यावेळी ठेकेदार लघुशंकेला जातो असे सांगून पळून गेला. त्यानंतर तो पुन्हा भेटलाच नसून त्याचा फोनवरही संपर्क होत नसून गेल्या चार महिन्यांपासून पगार रखडल्याचा आरोप चालक वसीम शेख यांनी केला आहे. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे चालकांवर उपासमारीची वेळ आल्याचेही खान