सलमान आणि कतरीना करणार बिग बॉसचे सुत्रसंचालन?

सामना ऑनलाईन । मुंबई

‘बिग बॉस’चा 12वा सीझन 16 सप्टेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. गेल्या बुधवारी झालेल्या लॉन्चिंग नंतर आता सलमानसोबत या शोचं सूत्रसंचालन कोण करणार हा प्रश्न प्रत्येक बिग बॉस चाहत्यांना पडला आहे. सध्या एक अफवा जोरात पसरत असून या अफवेनुसार या शोचं सूत्रसंचालन सलमान खान आणि कतरीना कैफ करणार आहेत.  जेव्हा सलमान खानला याबद्दल विचारले असता त्याने सांगितलं की, सूत्रसंचलन करण्यासाठी कतरीनाने एक अट घातली आहे. या कार्यक्रमासाठी तिने सलमान खानला सांगितलंय की तू तुझ्या पद्धतीने सूत्रसंचालन कर मात्र मी दिलेल्या स्क्रिप्टच्या आधारेच सूत्रसंचालन करेन. तिची ही अट मान्य करण्यात आली की नाही हे  कार्यक्रम सुरू झाल्यानंतरच कळू शकेल.