सलमान खानची चिमुरडीला मदत

8

सामना ऑनलाईन । जळगाव

जळगावात रक्तवाहिनीच्या विकाराने त्रस्त असलेल्या ओवी सूर्यवंशीला अभिनेतासलमान खानने मदतीचा हात दिला आहे. सहा महिन्यांच्या ओवीवर उपचारासाठी लागणाऱ्या साडेसहा लाखांचा खर्च उचलण्याची तयारी सलमान खानने दाखवली. गेल्या काही महिन्यांपासून ओवी मृत्यूशी झुंज देत होती.

तिच्यावरील उपचारांसाठी साडेसहा लाख रुपये खर्च लागणार होता. मात्र, शेतकरी असलेल्या सूर्यवंशी कुटुंबाकडे इतकी मोठी रक्कम नसल्यानं त्यांनी तिच्या उपचारासाठी शेत गहाण ठेवलं. मुंबईत ओवीवर उपचार करण्याचे प्रयत्न सुरू असताना सलमान खान मदतीला धावून आला. सलमानने तिच्या संपूर्ण उपचाराचा खर्च केल्यामुळे ओवीला जीवदान तर मिळालंच, शिवाय त्यांची शेतीसुद्धा कायम राहिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या