सलमान संघ दक्ष

  अभिनेता सलमान खान याने आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘मुंबई व्याख्यानमाला’ या कार्यक्रमाला हजेरी लावली. संघाच्या कार्यक्रमातील सलमानच्या उपस्थितीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या असून त्याच्या ‘संघ दक्ष’ भूमिकेची सोशल मीडियात चर्चा रंगली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघच्या शतकपूर्तीच्या निमित्ताने मुंबईतील नेहरू सेंटरमध्ये दोन दिवसांची व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे. यावेळी सलमान खानने हजेरी लावली.