सलमान बनला ओल्डमॅन

23

सामना प्रतिनिधी, मुंबई

माझ्या दाढीत आणि डोक्यावरील जेवढे केस पांढरे आहेत त्यापेक्षा कितीतरी जास्त रंगीत माझं आयुष्य आहे… असं सांगणाऱया सलमानच्या ‘भारत’ या सिनेमाचे नवीन पोस्टर सोमवारी रिलीज करण्यात आले. यात सलमान पूर्ण सफेद दाढी आणि मिशीत दिसतोय.

सलमानच्या आगामी ‘भारत’ या सिनेमाचा ट्रेलर याच महिन्यात 24 तारखेला रिलीज होणार आहे. त्याआधी हे पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या पोस्टरमध्ये जॅकी श्रॉफही दिसतोय. यात त्याने सलमानच्या वडिलांची भूमिका केली आहे. ‘भारत’मध्ये आधी प्रियंका चोप्रा नायिका होती, पण तिने हा सिनेमा सोडल्यानंतर कतरिना कैफ सलमानची नायिका म्हणून समोर आली. यात तब्बू आणि दिशा पटानी यांच्याही भूमिका पाहायला मिळतील.

आपली प्रतिक्रिया द्या