एकिकडे बॉलीवूडचा दबंग सलमान खान याला बिश्नोई टोळीकडून जीवे मारण्याची धमकी आली असताना आता सलमानची एक्स गर्लफ्रेंड सोमी अली तिच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे. तिने थेट लॉरेन्स बिश्नोईला पत्र लिहीत त्याच्यासाठी खास मेसेज लिहून इच्छा व्यक्त केली आहे.
View this post on Instagram
सोमी अलीने लिहीलेल्या पोस्टमध्ये तिने लॉरेन्स बिश्नोई याचा मोबाईल नंबर मागत त्याच्याशी बोलण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सोमीने आपल्या पोस्टमध्ये लिहीले आहे की, हा लॉरेन्स बिश्नोईसाठी थेट मेसेज आहे. नमस्कार, लॉरेन्स भाई, तुम्ही तुरुंगातूनही झूम कॉल करत असल्याचे ऐकले आहे आणि पाहिलेही आहे. म्हणून तुमच्यासोबत थोडी माहिती शेअर करायची होती. कृपया मला सांगा, हे कसं शक्य होईल? संपूर्ण जगात माझे आवडते ठिकाण राजस्थान आहे. मला तुमच्या मंदिरात पूजेसाठी यायचे आहे. पण त्याआधी झूम कॉलवर बोलू आणि पूजेनंतर थोडी चर्चा करू. विश्वास ठेवा, मी जे काही सांगेन, त्या गोष्टी तुमच्यासाठी फायदेशीर आहेत. कृपया मला तुमचा फोन नंबर दिलात तर, फार आभारी राहीन. ते तुमच्या भल्यासाठी असेल, धन्यवाद. या पोस्टमुळे सोमी अली चर्चेत आली आहे.