सलमानला भेटण्यासाठी चाहत्याने सायकलवरून पार केले 600 किमीचे अंतर

बॉलिवूड अभिनेता दबंग सलमान खान हा कोट्यवधी चित्रपट चाहत्यांचा आवडता अभिनेता आहे. सलमानची एक झलक मिळविण्यासाठी चाहते तो जाईल तिथे गर्दी करत असतात. असाच एक चाहता सलमानला भेटण्यासाठी तब्बल 600 किमीचे अंतर सायकलवरून पार करून गुवाहटीला पोहोचला आहे. भुपेन लिकसॉन (52) असे त्या चाहत्याचे नाव आहे.

यावर्षीचा फिल्मफेअर सोहळा आसाममधील गुवाहटी येथे 15 फेब्रुवारीला पार पडणार आहे. यासाठी सलमान खान येणार हे नक्की असल्याने भुपेन यांनी त्याला भेटायला येण्याचे ठरवले. भुपेन त्यांच्या तिनसुकिया या गावावरून 8 फेब्रुवारीला सायकलवरून निघाले. 600 किमीचे अंतर पार करून ते 13 फेब्रुवारीला गुवाहटीला पोहोचले आहेत.

भुपेन यांच्या नावावर गिनिज बुक वर्ल्ड रेकॉर्ड देखील आहे. त्यांनी सायकलच्या हँडलला न पकडता तब्बल 48 किलोमीटरचे अंतर 60 मिनीटात पार केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या