सलमान खानच्या चाहत्यांसाठी ही दिवाळी म्हणजे पर्वणी ठरली आहे. कारण, त्याचा टायगर 3 हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला आहे. पण, नाशिकच्या मालेगाव येथे काही अतिउत्साही कार्यकर्त्यांनी भर चित्रपटगृहातच फटाके फोडले आहेत.
या प्रकाराचा व्हिडीओही व्हायरल झाला आहे. रविवारी 12 नोव्हेंबर रोजी सलमान खान अभिनित टायगर 3 हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे शो मालेगाव येथेही लावण्यात आले आहेत. रविवारी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमाराला स्क्रीनिंग सुरू असताना काही अतिउत्साही चाहत्यांनी चित्रपट गृहातच फटाके फोडायला सुरुवात केली. त्यात रॉकेट्स, फटाक्यांची माळ, सुतळी बॉम्ब आणि अन्यही आवाजाचे फटाके होते.
View this post on Instagram
या प्रकाराने चित्रपटगृहात आग लागू शकली असती किंवा उपस्थित अन्य प्रेक्षकांनाही दुखापत झाली असती. पण, सुदैवाने फार मोठी दुर्घटना घडली नाही. या प्रकरणी पोलिसांनी फटाके फोडणाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. अद्याप एकही अटक झालेली नसून पोलीस तपास करत आहेत.