सलमान खानचं लग्न झालंय? पत्नी नूर व 17 वर्षीय मुलगी दुबईत राहात असल्याचा दावा

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने वयाची पन्नाशी ओलांडली असली तरी आजही तो अविवाहित आहे. मात्र सलमान खान विवाहित असून त्याची पत्नी आणि मुलगी दुबईत राहते असा दावा करण्यात आला आहे. सोशल मीडियावर करण्यात आलेल्या एका दाव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

सोशल मीडियावर एका ट्रोलरने सलमान खानचे लग्न झाल्याचा दावा केला.सलमानचा भाऊ अरबाज खान यानेच ट्रोलरची सोशल मीडियावरील एक कमेंट वाचून दाखवली. या कमेंटमध्ये सलमान खान लोकांना येडा बनवत असून त्याचे लग्न झाल्याचा दावा करण्यात आला आहे. सलमान खानची नूर नावाची पत्नी आणि 17 वर्षीय मुलगी दुबईत आहे, असा दावा ट्रोलरने केला. सलमान खान नुकताच अरबाज खान याच्या ‘पिंच 2’ या शोमध्ये उपस्थित राहिला होता, त्यावेळी अरबाजने ट्रोलरची कमेंट वाचून दाखवली.

अरबाज खान याने कमेंट वाचून दाखवताच सलमानचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. लोकांना माझ्याबाबत अधिकच माहिती आहे. मात्र हे सर्व खोटे आहे. यांना (ट्रोलर) हे सर्व कोण सांगते आणि हे कुठे वाचतात काय माहिती, असे म्हणत सलमानने ट्रोलरचा दावा फेटाळून लावला. तसेच माझे लग्न झालेला नाही आणि मी नवव्या वर्षापासून हिंदुस्थानमधील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतो, असेही सलमान म्हणाला.

Photo – सनी लियॉन ते अजय देवगण, कलाकारांची खरी नावे माहितीय का?

दरम्यान, अरबाज खान याचा ‘पिंच – 2’ हा ‘पिंच’ या शोचा दुसरा भाग आहे. पहिला भाग सुपरहिट झाल्यानंतर दुसऱ्या भागात आता अनन्या पांडे, टायगर श्रॉफ, फरहान अख्तर, कियारा आडवाणी, राजकुमार राव आणि फराह खान यासारखे सेलिब्रिटी दिसणार आहेत. तसेच आपण स्वत:च्या हिंमतीवर शो हिट करून दाखवणार होतो आणि त्यामुळेच पहिल्या भागात सलमान खान याला बोलावले नाही, असे अरबाज म्हणाला.

पाहा व्हिडीओ –

आपली प्रतिक्रिया द्या