सलमान खानचे कौतुकास्पद पाऊल, सेटवर थुंकण्यास मनाईचे फर्मान

825

अभिनेता सलमान खानचा Dabangg 3 हा चित्रपट येणार आहे. त्याने पुढच्या चित्रपटासाठीही काम सुरू केले असून या चित्रपटाचे नाव ‘राधे’ आहे. हा मारधाडपट असून यासाठी सलमान खान बरीच मेहनत घेत आहे. या चित्रपटाच्या सेटवर सलमान खानने 15 अटी घातल्या असून त्या सगळ्यांना पाळाव्या लागणार आहे.

प्रदर्शनापूर्वीच ‘दबंग 3’ने कमवले 155 कोटी

आतापर्यंत फोटो लीक होत असल्याने अनेक चित्रपटांच्या सेटवर मोबाईलवर बंदी घालण्यात आली होती. मात्र सलमान खानने याव्यतिरिक्त 15 असे नियम बनवले आहेत जे सगळ्यांसाठी लागू असणार आहेत. या नियमांमध्ये पान मसाला गुटखा खायचा नाही, थुंकायचे नाही, शिवीगाळ करायची नाही आणि कनिष्ठांसोबत चांगला वर्तन या नियमांचा समावेश आहे. राधे या चित्रपटाचे चित्रीकरण वांद्रेमधील मेहबूब स्टुडियोमध्ये सुरू आहे. पूर्वी अशी शक्यता वर्तवली जात होती की राधे हा चित्रपट वाँटेडचा पुढचा भाग आहे. सलमान खानने याला नकार दिला असून हा चित्रपट पूर्णपणे वेगळा असल्याचं सांगितलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या