मुस्लिमांनी घरीच राहून साजरी केली शब-ए-बारात, सलमान खानने मानले आभार

1142

कोरोना व्हायरसचं संक्रमणाला थांबवण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. तमाम नागरिक घरात थांबून या विषाणूला रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. विविध धर्मीय आपापले सणही घरात राहूनच साजरे करत आहेत.

गुरुवारीही देशभरातील अनेक मुस्लीम धर्मियांनी त्यांच्या शब-ए-बारात या सणाला घरात राहण्याला प्राधान्य दिलं आहे. त्यामुळे अभिनेता सलमान खान याने बंद असलेल्या मशिदींचा फोटो टाकून तमाम मुस्लीम धर्मियांना धन्यवाद दिले आहेत. देशाच्या सध्याच्या परिस्थितीला समजून घेण्यासाठी आणि त्यानुसार पालन करण्यासाठी धन्यवाद. परमेश्वर प्रत्येकाला सुरक्षित ठेवो, अशा शब्दात सलमानने मुस्लीम धर्मियांचे आभार मानले आहेत.

याआधी सलमानने एक व्हिडीओ शेअर करून लोकांना घरातच राहण्याचं आवाहन केलं होतं. गेले तीन दिवस मी माझ्या फार्महाऊसवरच अडकून आहे. माझे वडील सलीम खान हे घरात एकटेच आहेत. गेल्या तीन आठवड्यांपासून मी माझ्या वडिलांना पाहिलेलं नाही. पण कोरोनाला रोखण्यासाठी आहोत त्या जागी राहणंच उत्तम असल्याचं सांगत सलमानने लोकांनाही घरीच राहण्याचं आवाहन केलं होतं.

आपली प्रतिक्रिया द्या