सलमानला जोधपूर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश

778

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खान याच्या अडचणीत वाढ झाली आहे. 28 सप्टेंबरला सलमानला पुढील सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश जोधपूर जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी दिले आहेत. जोधपूर जिल्हा सत्र न्यायालयात आज झालेल्या सुनावणी दरम्यान सलमानचे वकील हस्तीमत सारस्वत उपस्थित होते. यापूर्वी सलमानने सुनावणीसाठी कोर्टात हजर न राहण्यासाठी सूट मागितली होती. त्यावेळी कोर्टाने त्याची ही विनंती मान्य केली होती. आता मात्र कोर्टाने त्याला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. राजस्थानात 1998 मध्ये ‘हम साथ साथ है’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी काळवीटाची शिकार केल्याप्रकरणी सलमानला दोषी ठरविले होते. या प्रकरणी 1998 आणि 2007 मध्ये दोनदा त्याला जोधपूर कारागृहात जावे लागले होते. या प्रकरणात सलमानसह चित्रपटातील अन्य कलाकारांवर देखील आरोप होते. पण, सलमानकडे शस्त्र सापडल्याने त्याला दोषी ठरवले होते.

आपली प्रतिक्रिया द्या