‘टायगर जिंदा है’मधून सलमान पुन्हा येणार भेटीला..

44

सामना ऑनलाईन । मुंबई

यंदाच्या ख्रिसमसला सलमान खानच्या प्रेक्षकांसाठी एक चांगलीच पर्वणी असणार आहे. सलमान खान अभिनित दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्या ‘टायगर जिंदा हा चित्रपट ख्रिसमसच्या आधी रिलीज होणार आहे. त्यामुळे चित्रपटाच्या प्रमोशनला सुरुवात झाली आहे. नुकतंच या चित्रपटाचं एक पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. हा चित्रपट एक अॅक्शन चित्रपट आहे, त्यामुळे प्रेक्षकांना एका जागी खिळवून ठेवण्यासाठी चित्रपटात हॉलिवूडमध्ये वापरण्यात येणाऱ्या विशेष तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

सलमान या चित्रपटात रॉ एजंटच्या भूमिकेत असून कतरिना आयएसआय एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. विशेष म्हणजे, एक था टायगरमध्ये एखाद दुसऱ्या सीनमध्ये दिसलेली कतरिना इथे सलमानच्या जोडीने स्टंट्स करताना दिसणार आहे. त्यासाठी ती विशेष ट्रेनिंगही घेत आहे. पाच वर्षांनंतर सलमान आणि कतरिना एकत्र काम करणार असून येत्या २२ डिसेंबर रोजी टायगर जिंदा है प्रदर्शित होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या