अध्यक्षपद राहुल गांधींवर लादू नका, त्यांना वेळ द्या; ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांचे मत

467

काँग्रेसमध्ये राहुल गांधी हे नेते म्हणून कायम आहेत. त्यांनी पुन्हा संघटनेत प्रमुखपदावर परतावे, असे पक्षातील नेत्यांना नेहमीच वाटत असते. याबाबत निर्णय घेण्यासाठी त्यांना वेळ देण्याची आवश्यकता असून अध्यक्षपद त्यांच्यावर लादण्यात येऊ नये, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी व्यक्त केले.

काँग्रेस पक्ष सध्या संक्रमणातून वाटचाल करत आहे. मात्र सोनिया गांधी यांच्या नेतृत्वामुळे पक्षात आज तरी कोणतेही संकट उभे राहिलेले दिसत नाही. त्यामुळे काँग्रेसच्या नेतृत्वावरून पक्षात विनाकारण वाद निर्माण होतील, अशी वक्तव्ये कुणीही माध्यमांसमोर करू नयेत. राहुल गांधी हे पक्षात आजही सर्वोच्च स्थानी आहेत याचा विसर पडू देऊ नका, असे मत खुर्शीद यांनी व्यक्त केले. काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्याची मागणी शशी थरूर व संदीप दीक्षित यांनी केली आहे. याकडे सलमान खुर्शीद यांचे लक्ष वेधले असता यापूर्वी अध्यक्षपदासाठी निवडणुका घेतल्या होत्या, पण अशा प्रकारे नेतानिवडीसाठी निवडणूक घेणे योग्य नाही, असे आपले स्पष्ट मत असल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या