
अभिनेत्री, गायिका आणि डिझायनर सलोनी बत्रा तिच्या आकर्षक अभिनयामुळे चित्रपटसृष्टीत नेहमीच चर्चेत असते. “सोनी” (2018), “तैश” (2020), आणि “200: हल्ला हो” (2021) मधील तिच्या अभिनयाने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी सलोनी आता अॅनिमल या बहु्प्रतिक्षित चित्रपटातू रूपेरी पडद्यावर झळकणार आहे.
अॅनिमल या चित्रपटात सलोनी रणबीर कपूरच्या बहिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाच्या चित्रिकरणादरम्यान चित्रित केलेले काही क्षण चित्रपटाच्या टिमने शेअर केले आहेत. या फोटोमध्ये रणबीर आणि सलोनी या कलाकारांमधील खास नाते दिसत आहे. त्यामुळे चित्रपटाच्या रिलीजची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. संदिप रेड्डी वंगा दिग्दर्शित अॅनिमल मध्ये अनिल कपूर, बॉबी देओल, रश्मिका मंधाना आणि तृप्ती डिमरी हे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत.