मिठाचा असाही उपयोग

> जेवणाला चव येण्यासाठी मीठ हवेच, पण मिठाचे आणखीही काही फायदे आहेत.

 > फ्रीजमध्ये दुर्गंध येत असेल तर सोडा वॉटरमध्ये मीठ घालून त्याने फ्रीज साफ करा. मग तो डिफ्रॉस्ट करा.

> फर्निचर साफ करताना ओल्या ब्रशला मीठ लावा. मग सुकायला ते फर्निचर उन्हात ठेवा. पिवळे पडणार नाही.

> रात्री बुटांमध्ये मीठ घालून ठेवा. सकाळी ते काढून टाका. यामुळे आत मॉइश्चर जमून दुर्गंध येण्याचे बंद होईल.

> जीन्सच्या जुन्या पॅण्ट धुण्यासाठी वॉशिंग मशीनध्ये डिटर्जंटबरोबरच एक चमचा मीठही टाका. यामुळे जीन्सची गेलेली चमक परत येईल.

> पांढऱया कपडय़ांना घामाचे डाग पडले असतील तर कोमट पाण्यात मीठ घालून त्यात तो भाग भिजवायचा. काही वेळाने ब्रशने डाग घालवायचे.

> हाताचा कांदा किंवा लसणाचा वास जात नसेल तर थोड्या व्हिनेगरमध्ये

> मीठ मिसळून ते हाताला लावायचे. वास निघून जाईल.

> मुंग्यांचा त्रास दूर करायचा तर घराच्या कोपऱ्यात आणि खिडक्यांच्या दरवाजांवर मीठ टाकून ठेवा किंवा मिठाच्या पाण्याने पुसून घेतल्यावरही मुंग्या जातात.

> फ्लॉवरपॉटमध्ये पाणी भरताना त्यात चिमूटभर मीठ टाका. यामुळे फुले जास्त वेळ फ्रेश राहातील.

> कॉटनच्या कपडय़ांवर रक्ताचे डाग लागलेले असतील तर थंड पाण्यात मीठ मिसळून तो भाग त्यात भिजवायचा. काही वेळाने कोमट पाण्याने धुवा.

> ओव्हन तेलकट झाला असेल तर मिठाच्या पाण्याने तो साफ करा. स्वच्छ होईल.

आपली प्रतिक्रिया द्या