राफेल नदालला पराभवाचा शॉक, सॅम क्वेरीची जेतेपदाला गवसणी

20

सामना ऑनलाईन, ऍकापुलको (मेक्सिको) – एटीपी मेक्सिको ओपन या टेनिस स्पर्धेतील पुरुषांच्या एकेरीच्या अंतिम फेरीत जागतिक रँकिंगमध्ये ४० व्या स्थानावर असलेल्या सॅम क्वेरीने स्पेनचा स्टार टेनिसपटू राफेल नदालला हरवत जेतेपदावर अगदी रुबाबात मोहर उमटवली. सॅम क्वेरीने दुसऱ्या सीडेड राफेल नदालला ६-३, ७-६ अशा फरकाने हरवत झळाळता करंडक पटकावला.

सॅम क्वेरीने पहिल्यांदाच राफेल नदालला हरवण्याची करामत करून दाखवली. दोन खेळाडूंमध्ये आतापर्यंत पाच लढती झाल्या आहेत. तसेच सॅम क्वेरीचे हे नववे एटीपी जेतेपद ठरले हे विशेष. दरम्यान, याआधी राफेल नदालने मरीन सिलीचला तर सॅम क्वेरीने निक किरगियोसला पराभूत करीत अंतिम फेरीत धडक मारली. राफेल नदालने याआधी २००५ व २०१३ सालामध्ये ही स्पर्धा जिंकण्याची किमया साध्य केली होती.

ऍण्डी मरे ठरला जेता

ग्रेट ब्रिटनच्या ऍण्डी मरे याने फर्नांडो वरदॅस्कोला पराभूत करीत दुबई टेनिस चॅम्पियनशिप पटकावण्याचा मान संपादन केला. ऍण्डी मरे याला या वर्षी पहिल्यांदाच एखाद्या स्पर्धेच्या अजिंक्यपदाला मिठी मारता आली असून एकूण ४५ जेतेपदी त्याने आतापर्यंत जिंकली आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या