समता राष्ट्रीय जम्प रोप स्पर्धा; 98 सुवर्णपदके मिळवत महाराष्ट्र अव्वल स्थानी

समता राष्ट्रीय जम्प रोप स्पर्धेत महाराष्ट्राने बाजी मारली आहे. मुला-मुलींच्या दोन्ही गटांत 98 सुवर्णपदक मिळवत महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे. 16 राज्यातील 450 स्पर्धक यात सहभागी झाले होते. सहभागी संघांपैकी सांघिक आणि वैयक्तिक प्रकारात मुलां- मुलीमध्ये 98 सुवर्ण , 64 रजत , 93 कांस्य पदके मिळवत महाराष्ट्र अव्वल स्थानी राहिला.

24 सुवर्ण ,18 रजत , 14 कास्य पदके मिळवून हरियाणा द्वितीय स्थानावर राहिला. तर तसेच आंध्र प्रदेश संघातील स्पर्धकांनी 19 सुवर्ण , 46 रजत , 68 कांस्य पदके मिळवून तिसऱ्या स्थानावर आहे. 20 सुवर्ण 24 रजत , 14 कांस्य पदके मिळविणारा मध्य प्रदेश चौथ्या स्थानावर आहे. डेमो सादरीकरणात मध्यप्रदेश प्रथम तर महाराष्ट्र दुसऱ्या तर छत्तीसगड तिसऱ्या स्थानावर असल्याची माहिती आयोजकाकडून देण्यात आली.

जम्प रोप या खेळाला राष्ट्रीय दर्जा मिळाल्यामुळे देशाचे नाव उंचावण्यात या खेळाची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ग्रामीण भागात राष्ट्रीय पातळीवरील जम्प रोप स्पर्धांचे आयोजन करत समता इंटरनॅशनल स्कूलने आम्हा कोपरगावकरांचा सन्मान केल्याचे गौरवउद्गार सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात व्यक्त केले. यावेळी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.

या स्पर्धेत अनेक विक्रम करण्यात आले. 3 मिनिट इंडूरन्स या प्रकारात जम्प मारण्याचा 414 जम्पचे रेकॉर्ड होते.ते रेकॉर्ड महाराष्ट्र संघातील रुद्र तोंडवाल याने 448 जम्प मारत आधीचे विक्रम मोडीत काढले. नवीन रेकॉर्ड केल्याबद्दल त्याला नगर जिल्हा जम्प रोप असोसिएशनच्या वतीने ट्रॅक सूट आणि रोख 4 हजार रुपये रोख देण्यात आले. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने जास्तीत जास्त पदके मिळवत मुला व मुलींच्या संघाने जनरल चॅम्पियनशिप मिळविली आहे. परिक्षक म्हणून धर्मेश परमार (गुजरात), राजेंद्र प्रसाद (तेलंगणा), आरिफ खान (राजस्थान), मुकुंद झोला (मध्य प्रदेश), उत्पल बोरा (आसाम), गोपेश चांदणी (छत्तीसगड), पवन सिंग व डॉक्टर सीमा पवनगोत्रा (जम्मू काश्मीर) म्हणून काम पाहिले.