संभाजी पाटलांनी फेटाळले आरोप; १ एप्रिलला देणार स्पष्टीकरण

47

सामना प्रतिनिधी । लातूर

आपली राजकीय कारकिर्द जाणिवपूर्वक डागाळण्यासाठी विरोधकांकडून वारंवार व्हिक्टोरीया कंपीच्या प्रकरणाचा उल्लेख केला जातो. माझ्या त्याच्याशी काहीच संबंध नाही. मी केवळ त्यांचा जामिनदार आहे. कर्ज प्रकरणाशी माझा संबंध नाही. या संदर्भात आपण १ तारखेस स्पष्टीकरण देणार आहे, अशी प्रतिक्रिया लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे.

   तब्बल ७६ कोटीच्या कर्ज प्रकरणात व्हिक्टोरीया अ‍ॅग्रो फुज प्रोसेसिंग कंपनीची केवळ २५ कोटीमध्ये बँकेने सेटेलमेंट केली. लातूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांमुळेच या  बँका उदार झाल्याचा आरोप होत आहे. त्यावर निलंगेकर यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.

‘लातूरात ३१ मार्च रोजी मराठवाडा कोच फॅक्टरीच्या भूमीपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. त्यामुळेच जाणिवपूर्वक हा विषय आपल्या विरोधकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. वातावरण दुषीत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. माझ्या निवडणूकीपासून ते मंत्रीमंडळाच्या विस्तारापर्यंत सातत्याने तोच तोच विषय काढण्याचे काम विरोधक करीत आहेत.

    माझा आणि त्या कारखान्याचा काहींच संबंध नाही. या भागाचा विकास व्हावा यासाठी आपण संबंधितांना या भागात कारखाना उभा करण्याची विनंती केली. मी केवळ त्यांचा जामिनदार आहे. उलट माझ्यामुळेच त्यांना त्रास सहन करावा लागलेला आहे. १ एप्रील रोजी मी या संदर्भात माझा रितसर खुलासा करणार असून दूध का दुध आणि पाणी का पाणी करेन’ असेही त्यांनी सांगीतले. कर्ज प्रकरणासंदर्भात बँकांची स्वतंत्र यंत्रणा आहे त्याच्याशी आपला काहीच संबंध नाही असेही  निलंगेकर यांनी सांगीतले.

आपली प्रतिक्रिया द्या