धर्मांधांना धसकी, हिंदूंना दिलासा; पोलिसांची रझाकारी झुगारून संभाजीनगरात हिंदू शक्तीचा जागर

113

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

पोलिसांची रझाकारी झुगारून रणरणत्या उन्हात संभाजीनगरमध्ये शनिवारी हिंदू शक्तीचा जागर झाला. हिंदूंचा मोर्चा निघूच नये यासाठी पोलिसांनी प्रचंड आटापिटा केला. दहशत निर्माण केली. गल्लीबोळात पोलिसांच्या फौजा उभ्या करण्यात आल्या. परंतु ही दंडेली मोडून काढत हजारोंच्या संख्येने हिंदू रस्त्यावर उतरले. विभागीय आयुक्तालयांकडे मोर्चाने कुच करताच हादरलेल्या पोलिसांनी मोर्चा अडवला. हजारो हिंदूंना अटक करून सोडून देण्यात आले.

फोटो गॅलरी : संभाजीनगरात हिंदू शक्तीचा जागर

११ मे रोजी रात्री धर्मांध मुस्लिमांनी किरकोळ कारणावरून जुन्या शहरात दंगल पेटवली. जगनलाल बन्सीले या हिंदूस जिवंत जाळले. राजाबाजार, मोतीकारंजा, चेलीपुरा, शहागंज आदी भागांत हिंदूंच्या घरांमध्ये पेट्रोलबॉम्ब फेकण्यात आले. दंगलखोरांनी गलोलीचा वापर करून दगडगोट्यांचा वर्षाव केला. यात चार पोलीस अधिकाऱ्यांसह अनेक जण जखमी झाले. पेटलेले शहर दंगलखोरांच्या हवाली करून पोलीस पळून गेले. रात्री उसळलेल्या या दंगलीत हिंदूंच्या मदतीसाठी शिवसैनिक धावले. शिवसैनिकांसह हिंदू नागरिकांनी तब्बल आठ तास किल्ला लढवून दंगलखोरांना रोखले नसता शहरात अनर्थ घडला असता. दंगलखोरांसमोर नांगी टाकलेल्या पोलिसांनी कारवाईच्या नावाखाली अटकेचा वरवंटा मात्र हिंदूंवरच फिरवला. शिवसेना नगरसेवक राजेंद्र जंजाळ, लक्ष्मीनारायण बाखरिया यांच्यासह अनेक हिंदूंना अटक करण्यात आली.

झुंडीच्या झुंडी लोटल्या
पोलिसांच्या या मोगलाईच्या विरोधात आज समस्त हिंदूंच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. सकाळी दहा वाजेपासून पैठणगेट परिसरात हिंदूंच्या झुंडीच्या झुंडी लोटत होत्या. ‘जय भवानी, जय शिवाजी’, ‘हिंदू शक्तीचा विजय असो’ अशा घोषणांनी आसमंत निनादून गेला होता. तासाभरात पैठणगेट परिसरात पाय ठेवायलाही जागा शिल्लक राहिली नाही. दुपारी बारा वाजता शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, सहसंपर्वâप्रमुख अण्णासाहेब माने, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, आमदार संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अ‍ॅड. देवयानी डोणगावकर आदींच्या नेतृत्वाखाली रणरणत्या उन्हात भगव्याचे हे तुफान विभागीय आयुक्तालयाकडे निघाले.

हात जोडून विनंती करतो…
पैठणगेटवरून निघालेला हा मोर्चा पोलिसांनी टिळकपथावर अडवला. पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, डॉ. दीपाली घाडगे आदी पोलीस अधिकाऱ्यांनी मोर्चेकऱ्यांना पुढे न जाण्याची विनंती केली. मोर्चा शहागंजातून गेल्यास आणखी बिकट परिस्थिती उद्भवू शकते. पोलीस खात्याला सहकार्य करावे, अशी विनंती या अधिकाऱ्यांनी केली. त्यानंतर मोर्चा सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या मैदानाकडे वळवण्यात आला. प्रतीकात्मक कारवाई करून मोर्चेकऱ्यांना सोडून देण्यात आले.

हिंदूंकडे वाकडी नजर कराल तर, खबरदार…
सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या मैदानावर मोर्चेकऱ्यांना महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, मुंबई येथून खास मोर्चासाठी आलेले जितेंद्र महाराज, वारकरी संघटनेचे प्रकाश महाराज बोधले, शिवाजी इंजे यांनी मार्गदर्शन केले. आता हिंदूंकडे वाकडी नजर करून बघाल तर याद राखा, जशास तसे उत्तर दिले जाईल, असा खणखणीत इशारा मोर्चेकऱ्यांनी दिला.

दोन हजार पोलिसांचा फौजफाटा
समस्त हिंदूंच्या वतीने काढण्यात येणाऱ्या या मोर्चाला परवानगी नाकारून पोलिसांनी सुरुवातीलाच अपशवूâन करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मोर्चा होऊच नये यासाठी अख्खी पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरली. स्वत: प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी पैठणगेटला येऊन बंदोबस्ताची पाहणी केली. दोन पोलीस उपायुक्त, चार सहायक पोलीस आयुक्त, पंधरा पोलीस निरीक्षक, तीस सहायक पोलीस निरीक्षक, ५०० पोलीस कर्मचारी, दंगाकाबू पथक, एसआरपीच्या सात तुकड्या, वङ्का, वरुण तसेच व्हिडिओ कॅमेरे असा तब्बल दोन हजारांचा फौजफाटा मोर्चाच्या बंदोबस्तासाठी लावण्यात आला होता. प्रथमच बॉडी प्रोटेक्टर असलेले ४० जवानांचे पथक आघाडीवर ठेवण्यात आले होते.

दंगलीत कुठे एवढे पोलीस दिसले नाहीत…
मोर्चेकऱ्यांच्या वतीने शिवसेना नेते खासदार चंद्रकांत खैरे, महानगरप्रमुख प्रदीप जैस्वाल, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे, आमदार संजय शिरसाट, महापौर नंदकुमार घोडेले आदींच्या शिष्टमंडळाने विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांना निवेदन दिले. यावेळी खासदार खैरे यांनी दंगलीच्या वेळी पोलिसांचा फौजफाटा दिसला नाही आज एवढे पोलीस कुठून आले, असा संतप्त सवाल केला. हिंदूंच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या शिवसैनिकांना पोलीस जाणीवपूर्वक त्रास देत असल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

आपली प्रतिक्रिया द्या