संभाजीनगरात मातृ-पितृ पूजन कृतज्ञता सोहळा उत्साहात

507

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त संभाजीनगर शिवसेना शाखेच्या वतीने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आयोजित मातृ-पितृ पूजन, वंदन सोहळा पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत थाटात साजरा झाला. यावेळी अकराशे मात्या-पित्यांचे पूजन करण्यात आले.

aur1

श्रीहरी पँव्हेलियन येथे मातृ-पितृ पूजन कार्यक्रमाचे उद्घाटन शिवसेना नेते तथा पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, नरेंद्र त्रिवेदी, आमदार संजय सिरसाट, आमदार प्रदीप जैस्वाल, शिवसेना उपनेत्या, महिला आघाडीच्या संपर्क प्रमुख आमदार डाँ. मनिषा कायंदे, महापौर नंदकुमार घोडेले, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, सभागृह नेता विकास जैन, विधानसभा संघटक राजू वैद्य, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विश्वनाथ स्वामी, बाबासाहेब डांगे, जिल्हा युवा अधिकारी ऋषिकेश खैरे, महिला आघाडीच्या सुनिता देव, सुनिता आऊलवार आदींची उपस्थिती होती.

aur

आपली प्रतिक्रिया द्या