राज्यस्तरीय रांगोळी स्पर्धेत समीर चांदरकर प्रथम 

431
सामना ऑनलाईन । मालवण 
लोकरंगभूमी शांतीनिकेतन सांगलीच्या वतीने स्वर्गीय प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांच्या ८५ व्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय खुल्या रांगोळी (पोट्रेट) स्पर्धेत मालवण कट्टा येथील राडकर हायस्कूलचे कलाशिक्षक समीर अशोक चांदरकर यांनी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. 
सांगली येथे १३ व १४ जानेवारीला राज्यस्तरीय खुली रांगोळी स्पर्धा पार पडली. राज्यस्तरीय स्पर्धेसाठी व्यक्तीचित्र असा विषय ठेवण्यात आला होता. यात चांदरकर यांनी भारतीय सैन्य व त्यांच्या कुटुंबियांना समर्पित अशी रांगोळी रेखाटली. देशाची सेवा करताना अनेक वीर जवान शहीद होतात. त्यांच्या मागे त्यांच्या कुटुंबियांना होणाऱ्या वेदना त्यांनी रांगोळीतून रेखाटल्या. 
rangoli
राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. १० हजार रुपये रोख, चषक व प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या स्पर्धेत मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, वर्धा, कोल्हापूर, रत्नागिरी सोलापूर व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ६० हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. गतवर्षी चांदरकर यांना द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. कलाशिक्षक चांदरकर यांच्या यशाबद्दल सर्वत्र त्यांचे कौैतुक होत आहे. 
आपली प्रतिक्रिया द्या