खेडमध्ये मनसेच्या माजी नगरसेविका संपदा गुजराथी यांचा शिवसेनेत प्रवेश

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माजी नगरसेविका व महिला आघाडीच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षा संपदा गुजराथी यांनी बुधवारी शिवसेना नेते, रामदास कदम व खेड दापोली मंडणगडचे आमदार योगेश कदम यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

२००६ साली झालेल्या खेड नगरपालिकेच्या निवडणुकीत संपदा गुजराथी या वॉर्ड क्रमांक १० मधून निवडून आल्या होत्या. काही वर्षांपूर्वी मनसेच्या पदांचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यावर त्या घरीच होत्या. त्यांचे पती दोन मुलं आणि त्या स्वतः यांनी रामदास कदम यांच्या जामगे निवास्थानी जाऊन शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना नेते रामदास कदम व आमदार योगेश कदम यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

गेले काही महिने खेड तालुक्यात शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या चांगलीच वाढली आहे. दापोली मतदार संघाचे आमदार योगेश कदम यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत अन्य पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हाती शिवबंधन बांधत आहेत. दोन दिवसांपूर्वी तालुक्यातील कुळवंडी येथील सुमारे २०० कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता. त्यानंतर बुधवारी मनसेच्या माजी नगरसेविका संपदा गुजराती यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. आगामी काळात आणखी काही कार्यकर्ते शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या