मेहनतीतून देव मिळतो!

64

खूप मेहनत केल्यानंतर एखादी गोष्ट आपल्याला साध्य होते. त्यावेळी आपले कौतुक होते. यामुळे आपल्यामध्ये जी सकारात्मकता येते तिला मी ‘भक्ती’ असे म्हणते. ही भक्ती साध्य करण्याविषयी सांगतेय प्रसिद्ध अभिनेत्री आणि निवेदिका संपदा जोगळेकर-कुलकर्णी

देव म्हणजे ? – सकारात्मक ऊर्जा. जी मला कधी एखादी वास्तू, ऊर्जा, व्यक्ती आणि कामातून मिळते. ती ऊर्जा म्हणजे माझ्यासाठी देव आहे.

आवडते दैवत ? –  गणपती बाप्पा

धार्मिक स्थळ ? – कोल्हापूरचं महालक्ष्मी मंदिर

आवडती प्रार्थना – खरा तो एकची धर्म…

आवडते देवाचे गाणे ? – देवा तुझ्या दारी आलो गुणगान गाया…  प्रसिद्ध प्रवचनकार चारुदत्त आफळे यांच्या रचना ऐकायला खूप आवडतात.

धार्मिक साहित्य कोणतं वाचलंय का ? – भगवद्गीता वाचली आहे.

दैवी चमत्कारांवर विश्वास आहे का ? –  नाही, कधी अनुभव नाही आला.

शुभ रंग ? – पिवळा

एखादी गोष्ट जी केल्यावर समाधान मिळतं ? – एखाद्या व्यक्तीला जी वस्तू आवडत असेल ती त्याला दिली की मला समाधान वाटतं.

देवावर किती विश्वास आहे ? – खूप विश्वास आहे.

दुःखी असतेस तेव्हा ? –  खूप रडते.

नास्तिक लोकांबद्दल काय सांगशील ? – ‘नास्तिक’ या भावनेचाही आदर केला पाहिजे. त्यांना जेव्हा वाटेल तेव्हा ते नक्कीच म्हणतील,

देवभक्त असावं, पण देवभोळं नसावं.. तुमचं मत काय ? – यासाठी कृतज्ञ असावं. पण आहारी जाऊ नये.

इच्छा पूर्ण होण्यासाठी नवस करता का ?- नवस म्हणजे काय माहीत नाही. प्रयत्न करण्यांकरिता मी देवाकडे प्रार्थना करते.

ज्योतिषशास्त्रवर कितपत विश्वास आहे ? – ‘भविष्यावर बोलू काही’ करायच्या आधी मी पूर्ण विरुद्ध होते. नंतर कार्यक्रमाच्या निमित्ताने जोतिषशास्त्र शिकले. तेव्हा यामध्ये खूप तथ्य आहे,

उपवास करता का ?  – नाही.

अभिनय आणि भक्तीची सांगड कशी घालता ? – नृत्यातील कौतुकामुळे किंवा मेहनतीमुळे यश मिळते,   याला मी ‘भक्ती’ असं मानते.

मूर्तिपूजा महत्त्वाची वाटते की प्रार्थना? – दोन्हीमुळे सकारात्मकता वाढते, असं वाटतं.

आपली प्रतिक्रिया द्या