फक्त 1,067 रुपयात घरी घेऊन जा Samsung चा लेटेस्ट 5G फोन, जाणून घ्या काय आहे ऑफर…

सॅमसंगने अलीकडेच आपला नवीन 5G स्मार्टफोन हिंदुस्थानात लाँच केला आहे. ज्याचे नाव Samsung Galaxy A22 5G असे आहे. या स्मार्टफोनची किंमत 21,999 रुपये आहे. ज्यात ग्राहकांना 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज मिळणार आहे. मात्र आज आम्ही तुम्हाला हा फोन तुम्ही कमी ईएमआयवर कसा खरेदी करू शकता, याबाबत माहिती सांगणार आहोत.

एसबीआयसह अनेक मोठ्या बँका या सॅमसंग फोनवर ईएमआयचा पर्याय देत आहेत. आम्ही यामध्ये सर्वात कमी ईएमआय असलेला पर्याय निवडला आहे. SBI क्रेडिट कार्डवर हा फोन 1,067 रुपयांच्या ईएमआयवर खरेदी करण्याचा पर्याय मिळत आहे. जे 24 महिने चालेल. या काळात वापरकर्त्यांना 3,601 रुपयांचे व्याज भरावे लागेल. यातच 7,505 रुपयांचा ईएमआय पर्याय देखील आहे, जो तीन महिन्यांसाठी असेल.

Samsung Galaxy A22 5G ची सुरुवातीची किंमत 19,999 रुपये आहे. ज्यात 6 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आले. त्याचबरोबर 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज 21999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन तीन कलर ऑप्शन्स ग्रे, मिंट आणि व्हायलेट कलर ऑप्शनसह बाजारात उपल्बध आहे.

फीचर्स

– 6.6 इंचाचा फुल एचडी प्लस इन्फिनिटी व्ही डिस्प्ले
– तीन रिअर कॅमेरा सेटअप
– प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा, 5 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर
– सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा
– 5000mAh ची बॅटरी
– यूएसबी, मायक्रो एसडी सपोर्ट, साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि 5 जी सारखे फीचर्स

आपली प्रतिक्रिया द्या