Samsung चे 6 दमदार ‘स्मार्टफोन’ झाले स्वस्त, जाणून घ्या

फेस्टिव्हल सिझनपूर्वी दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंगने 6 दमदार स्मार्टफोनच्या किंमतीत कपात केली आहे. यात सॅमसंगच्या Galaxy A आणि Galaxy M-Series च्या जबरदस्त स्मार्टफोनचा समावेश आहे. कंपनीने जवळपास 1500 रुपयांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. जाणून घेऊया कोणते आहेत हे स्मार्टफोन…

1. Samsung Galaxy A71

images-16
Galaxy A सिरीजमधील हा सर्वात महाग फोन आहे. याची  किंमत 30,999 रुपये आहे. मात्र कंपनी यावर 1500 रुपयांची सूट देत असून आता हा फोन 29,499 रुपयांना मिळत आहे. या स्मार्टफोनला 4 रियर कॅमेरे देण्यात आले असून मेन कॅमेरा 64 मेगापिक्सलचा आहे.

2. Samsung Galaxy A51

images-18
दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असणाऱ्या या स्मार्टफोनवर 1500 रुपयांची सूट मिळत आहे. 8 जीबी रॅम असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत 1500 रुपयांनी कमी होऊन 24,499 रुपये झाली आहे, तर 6 जीबी रॅम असणाऱ्या व्हेरिएंटची किंमत 1000 रुपयांनी कमी होऊन 22,999 रुपये झाली आहे. या फोनमध्ये 48 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 4000mAh ची दमदार बॅटरी आहे.

3. Samsung Galaxy A31

images-20
या स्मार्टफोनवर कंपनी 1000 रुपयांची सूट देत असून आयसीआयसीआय कार्ड होल्डरला 1000 रुपयांपर्यंत कॅशबॅक ऑफरही देत आहे. यामुळे हा फोन तुम्ही 18,999 रुपयांना खरेदी करू शकता. यात 48 मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा, इनफिनिटी-यू sAMOLED डिस्प्ले आणि 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

4. Samsung Galaxy A21s

images-19
या स्मार्टफोनवर कंपनी 1000 रुपयांची सूट देत असून यानंतर 6 जीबी रॅमच्या फोनची किंमत 16,499 आणि 4 जोबी रॅमची किंमत 14,999 रुपये झाली आहे. फोनला 48 मेगापिक्सलचा क्वॉड रियर कॅमेरा, इनफिनिटी-ओ डिस्प्ले आणि 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

5. Samsung Galaxy M01s

images-21
सॅमसंगचा हा स्मार्टफोन सर्वात स्वस्त असून याची किंमत 500 रुपयांनी कमी झाली आहे. सूट देण्यात आल्यानंतर आता हा फोन 9,499 रुपयांना खरेदी करू शकता. फोनला 13MP + 2MP रियर कॅकेर, 8MP चा सेल्फी कॅमेरा आणि 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

6. Samsung Galaxy M01 Core

images-22
Galaxy M01s प्रमाणे या फोनची किंमतही 500 रुपये कमी करण्यात आली असून 1GB+16 GB मॉडेलची किंमत 4,999 रुपये आणि 2GB+ 32GB मॉडेलची किंमत 5,999 झाली आहे. यात 8MP चा रियर कॅमेरा, 5MP चा सेल्फी कॅमेरा आणि 3000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.

सॅमसंगच्या ‘या’ नवीन स्मार्टफोनवर मिळतेय तब्बल 9 हजारांची सूट, जाणून घ्या कधीपर्यंत आहे ऑफर

आपली प्रतिक्रिया द्या