Samsung Galaxy A71 – चार कॅमेरे असणारा दमदार स्मार्टफोन हिंदुस्थानमध्ये लॉन्च

1378

हिंदुस्थान हे जगातील सर्वात मोठ्या स्मार्टफोनच्या मार्केटपैकी एक आहे. चीननंतर सर्वाधिक स्मार्टफोन खरेदी-विक्रीची उलाढाल होणाऱ्या या मार्केटवर आपले वर्चस्व असावे यासाठी जगभरातील स्मार्टफोन कंपन्या आत्याधुनिक फिचर्स असणारे स्मार्टफोन हिंदुस्थानमध्ये लॉन्च करत असतात. बुधवारी आणखी एका स्मार्टफोन कंपनीने आपला फोन हिंदुस्थानमध्ये लॉन्च केला.

दक्षिण कोरियाची प्रसिद्ध कंपनी संमसंगने आपला बहुप्रतिक्षीत ‘Samsung Galaxy A71’ हा स्मार्टफोन हिंदुस्थानमध्ये बुधवारी लॉन्च केला. तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असणाऱ्या या स्मार्टफोनमध्ये 64 मेगापिक्सलचा दमदार कॅमेरा देण्यात आला असून 8 जीबी रॅममध्ये हा फोन उपलब्ध आहे. या फोनची किंमत 29,999 पासून सुरू होत आहे. 24 फेब्रुवारीपासून हा फोन हिंदुस्थानी बाजारामध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.

samsung-galaxy-a7-2

तीन व्हेरिएंट –
1. क्रश सिल्वर व्हेरिएंट
2. ब्लू व्हेरिएंट
3. ब्लॅक व्हेरिएंट

samsung-galaxy-a7

फिचर्स –
1. 6.7 इंचांचा फुल एचडी प्लस डिस्प्ले
2. कस्टम यूजर इंटरफेस वन यूआई 2.0 ऑपरेटिंग सिस्टिम
3. 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरनल स्टोरेज
4. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज 512 जीबीपर्यंत वाढवता येणार
5. 4500 एमओएचची बॅटरी
6. 64 जीबी मेगापिक्सल बॅक कॅमेरा (5 मेगापिक्सलचा डेप्थ कॅमेरा, 5 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 12 मेगापिक्सलचा अट्रा वाईट कॅमेरा)
7. 32 जीबी मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा

आपली प्रतिक्रिया द्या