आला रे आला..! सॅमसंगचा बहुप्रतिक्षित ‘Galaxy M21s’ लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

सॅमसंगचा बहुप्रतिक्षित स्मार्टफोन ‘Galaxy M21s’ लॉन्च झाला आहे. दक्षिण कोरियन कंपनीने या फोन सध्या ब्राझीलमध्ये लॉन्च केला असून लवकरच तो जगातील अन्य देशात लॉन्च केला जाईल. Galaxy M सिरीजचा हा लेटेस्ट स्मार्टफोन असून 6000mAh ची दमदार बॅटरी हे याचे खास वैशिष्ट्य आहे.

Galaxy M21s ची ब्राझीलमधील किंमत 1,529 BRL (जवळपास 20,500 रुपये) एवढी आहे. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजमध्ये हा फोन उपलब्ध आहे. काळ्या आणि निळ्या रंगात हा फोन उपलब्ध असणार आहे.

screenshot_2020-11-06-17-11-15-742_com-simplemobilephotoresizer

Samsung Galaxy M21s मध्ये 6.4 इंच फुल एचडी+ (1080×2340 पिक्सल) सुपर एमोलेड डिस्प्लेदेण्यात आला आहे. फोनला ऑक्टा-कोर एक्सीनॉस 9611 प्रोसेसर देण्यात आला आहे. 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असणाऱ्या या फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या मदतीने 512 जीबी पर्यंत वाढवता येते.

स्मार्टफोनमध्ये 6000mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली असून ही बॅटरी 15 वाट फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. सोबत वाय-फाय, ब्लूटूथ 5.0, जीपीएस आणि 3.5 एमएम हेडफोन जॅक देण्यात आले असून फोनचे वजन 191 ग्रॅम आहे.

pic

कॅमेरा

या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 64 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, 8 मेगापिक्सलचा सेकंडरी आणि 5 मेगापिक्सलचा आणखी एक कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी यात 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या