सॅमसंग एस-८ दणक्यात लाँच, किंमत ५८,००० फक्त

26

सामना ऑनलाईन । मुंबई

सॅमसंग कंपनीचे बहुचर्चित गॅलेक्सी एस-८ आणि गॅलेक्सी एस-८ प्लस हे स्मार्ट फोन हिंदुस्थानात लाँच झाले आहेत. सॅमसंगच्या या दोन्ही मोबाईलची स्क्रीन सॅमसंग एस-७ प्रमाणेच ‘कव्हर्ड एज’ देण्यात आली असून एस-८ आणि एस-८ प्लस याफोनचे प्री-बुकिंग आता सुरू झाले आहे. फ्लिपकार्टवर या फोनची प्री-बुकिंग किंमत सॅमसंग गॅलेक्सी एस-८ साठी ५७,९०० रुपये आहे तर, सॅमसंग गॅलेक्सी एस-८ प्लस ६४,९०० रुपये इतकी आहे.

सॅमसंगच्या गॅलॅक्सी एस-८ आणि गॅलेक्सी एस-८ प्लस या स्मार्ट फोनची स्क्रीन अनुक्रमे ५.८ आणि ६.२ इंच इतकी असून या फोनमध्ये फिंगरप्रिंट सेंन्सर देण्यात आले आहेत. याव्यतिरिक्त या फोनमध्ये ४-जीबी रॅम आणि १२ मेगा पिक्सलचा कॅमेरा देण्यात आला असून हे दोन्हीही फोन वॉटर तसेच डस्टप्रूफ आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या