माझ्या बॉयफ्रेंडचे अनेक मुलींशी संबंध, अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

3251

सलमान खान सोबत चित्रपटांमध्ये झळकलेली अभिनेत्री सना खान व तिचा बॉयफ्रेंड मेलविन लुईसचे ब्रेकअप झाले आहे. मेलविनचे एकाचवेळी अनेक मुलींशी प्रेमसंबंध असल्याचा आरोप सनाने केला आहे. तिने इंस्टाग्रामवर एक लांबलचक पोस्ट लिहून मेलविनची सर्व पोलखोल केली आहे.


View this post on Instagram

This is my first n it has taken a lot of courage from me to come out n speak the truth. Coz there were so many people who believed in this relation n showed so much love n respect but unfortunately I didn’t get it from where I should have gotten. This man is dirt n he is disgusting unfortunately it took me a year to find out coz I believed in him blindly. I have taken a stand for myself coz if I won’t no one will He is a compulsive cheater n a compulsive liar n this is his regular thing to do with everyone for his fame n popularity. This is the original content with no fabrication but be ready for the covers on this Ps: cheated on me with multiple girls since may/June which I lately discovered but there is one girl tht shocked me the most n I knw her #shameonyou miss **** I will def tell the world ur name so atleast others knw u before they collab with you Upbringing matters a lot He wanted to marry me and have babies what would he teach my son n daughter??? #toxicrelationship #cheappeople

A post shared by Sana Khaan (@sanakhaan21) on

‘हे मी पहिल्यांदाच याविषयी बोलत आहे. खरं बोलायला खूप हिम्मत लागते. अशी बरिच लोकं आहेत जे आमच्या नात्याचा आदर करतात. मला सन्मान देतात पण ज्याच्याकडून मला सन्मान मिळायला हवा त्याच्याकडून तो मिळत नाही. जवळपास एक वर्ष लागलं मला हे समजायला की तो मला फसवतोय. माझ्यासोबत इतरही अनेक मुलींशी त्याचे अफेयर आहेत. हा माणूस अत्यंत घाणेरडा आहे आणि माझं दुर्दैव हे की मी त्याच्यावर डोळे झाकून प्रेम केलं’, असे सनान इंस्टाग्रामवर लिहले आहे.

sana-khan-melvin-1

मेलविनचे अफेयर असलेल्या मुलींपैकी एकीला सना देखील ओळखत असून तिने त्या मुलीला देखील या पोस्टमधून फटकारले आहे. ‘मे जून मध्ये मला त्याच्या अफेयरविषयी समजलं. त्यातील एक मुलगी तर माझ्या ओळखीची आहे. ते बघून तर मला धक्काच बसला. मला तिला सांगायचं आहे मी इथे जरी तुझं नाव घेतलं नसलं तरी लवकरच मी जगाला तुझं नाव सांगणार आहे’, अशा शब्दात सनाने त्या मुलीला फटकारले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या