सना रामचंद्र बनली पाकिस्तानात असिस्टंट कमिशनर

डॉ. सना रामचंद्र ही पाकिस्तानात असिस्टंट कमिशनर झालेली पहिली हिंदू महिला आहे. सना नुकतीच सेंट्रल सुपीरियर सर्क्हिस (सीएसएस 2020) परीक्षा उत्तीर्ण झाली असून तिला पाकिस्तानात प्रशासकीय सेवेत नोकरी मिळाली आहे. सना रामचंद्र ही एमबीबीएस डॉक्टर असून सिंध प्रांतातील शिकारपूर जिह्यात प्रॅक्टिस करते.

सना कराची इथे वास्तव्यास आहे. सीएसएस 2020 साठी 18 हजार 553 जणांनी परीक्षा दिली होती. त्यातून 221 जण उत्तीर्ण झाले आहेत. त्यातील सर्वेकृष्ट रँकिंग असलेल्या विद्यार्थ्यांना केंद्रीय पोलीस दलात पोस्टिंग मिळते.

सनाने यशाबद्दल आनंद व्यक्त केला असून याचे श्रेय आईवडिलांना दिले आहे. ‘मला मिळालेल्या यशाबद्दल मी खूप आनंदी आहे. मला यात आश्चर्य असे काही वाटत नाही. कारण मी तितकी मेहनत घेतली होती. त्यामुळे मला यश मिळेल हे निश्चित होतं. मी नेहमी शाळेत पहिला क्रमांक पटकवीयची. सीएसएस परीक्षा उत्तीर्ण होणार, असा मला विश्वास होता, असे सनाने सांगितले. तिच्यावर सर्व बाजूंनी अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. पाकिस्तानात खूप कमी हिंदू महिलांना यश मिळवता आलेलं आहे. सनाचे सोशल मीडियावरदेखील कौतुक केले जात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या