मुजोर वाळू माफियांचा पोलिसांवर हल्ला

सामना प्रतिनिधी । पंढरपूर

पंढरपूरमध्ये मुजोर वाळू माफियांनी पोलिसांवर धारदार शास्त्राने प्राणघातक हल्ला केला आहे. माण नदीतून अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर पोलिसांनी कारवाई करताना ही घटना घडली. सदरची घटना पंढरपूर तालुक्यातील
तनाळी येथील माण नदीच्या पात्रात येथे घडली आहे.

कारवाईत जप्त केलेला ट्रॅक्टर पोलीस ठाण्याकडे घेऊन जात असताना वाळू माफियांनी वाहन सोडून देण्याचा तगादा पोलिसांकडे लावला. त्यावेळी पोलीस कर्मचारी बाळासाहेब क्षीरसागर यांनी वाहन जप्त केले आहे देता येणार नाही असे बजावले. मात्र पोलिसांचे भय नसणाऱ्या वाळू माफियांनी धारदार शास्त्राने क्षीरसागर यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात क्षीरसागर गंभीर जखमी झाले आहेत. पोलिस कर्मचारी क्षीरसागर यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ला करणाऱ्या वाळू माफियावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या