जामखेडमध्ये वाळूतस्करांनी तहसील कार्यालयातून वाळूचा ट्रक पळवला

वाळू तस्करी करणारा ट्रक जप्त करून जामखेड तहसिल कार्यालयात ठेवण्यात आला होता. वाळू तस्करांनी थेट तहसिल कार्यालयातून वाळूचा जप्त केलेला ट्रक पळवून नेला आहे. नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांनी कर्जत रस्त्यावर वाळूसह भरलेला ट्रक पकडून तहसील कार्यालयात आणला होता.त्यानंतर काही वेळाने वाळूतस्करांनी तो ट्रक तहसील कार्यालयातून पळवला आहे. या घटनेचा महसूल प्रशासनाने निषेध केला असून चार महिन्यांत दुसर्‍यांदा अशी घटना घडली आहे.

नायब तहसीलदार नवनाथ लांडगे पोलीस पथकासोबत कारवाईसाठी बाहेर पडले होते. त्यांना कर्जत रस्त्यावर एक ट्रक वाळूची वाहतूक करताना दिसला. त्यांनी ट्रक थांबवून चौकशी केली आणि ट्रक तहसील कार्यालयात घेण्यास सांगितले. मंगळवारी रात्री 9 वाजता हा ट्रक तहसिल कार्यालयात आणला होता. वाळूतस्करांनी तो ट्रक पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास गेट तोडून वाळूचा ट्रक तहसील कार्यालयातून पळवला. गेल्या चार महिन्यात दुसऱ्यांदा अशी घचना घडली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या