रोलर स्केटवाले सँडल; किंमत दीड लाख

सामना ऑनलाईन, पॅरीस

पॅरिसमधील फॅशन हाऊस यूएस सेंट लॉरेंटने रोलर स्केटवाले सँडल लाँच केले आहेत. हाय हील असलेल्या या सँडलला खाली स्केटिंगसारखी चाके दिली आहेत. हे सध्या फॅशनचे न्यू कलेक्शन असून याची किंमत सुमारे एक लाख ६५ हजार इतकी आहे. फॅशन हाऊसने या सँडलच्या अनेक डिझाइन लाँच केल्या आहेत. मुलींसोबतच मुलांसाठीही शूज लाँच केले असून या सँडलला किती पसंती मिळते हे येणारा काळच सांगणार आहे.