Video – धक्कादायक! चक्क कचऱ्याच्या गाडीतून तरुणाचा मृतदेह नेला

1239

कोरोना झाला असल्याच्या अफवेमुळे जिवंतपणी मानसिक त्रास, तर मृत्यू नंतर ही ‘मृतदेहाची परवड. एका तरुणाचा मृतदेह नगरपालिका कर्मचाऱ्यांनी चक्क कचऱ्याच्या गाडीतून अंत्यसंस्कारासाठी नेल्याचा धक्कादायक प्रकार सांगली जिल्ह्यातील जत येथे घडला . जत नगरपरिषदेने आरोग्यअधिकाऱ्या कडे अॅम्ब्युलन्सची मागणी केली होती, मात्र 5 तास वाट बघुन देखील अॅम्ब्युलन्स मिळाली नसल्याने जत नगरपरिषदेने घंटा गाडीतून त्या तरुणाचा मृतदेह नेला. या घटनेमुळे शहरात संताप व्यक्त होत आहे.

सांगली जिल्ह्यातील जत येथील एक 35 वर्षीय तरुण रायगड तालुक्यातील तळोजा येथे कामास होता, मागील 17 तारखेला तो आपल्या गावी जतला आला. तो आल्या नंतर त्याला होम क्वारंटाइन करण्यात आलं होतं. तरुण आजारी होता. एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र त्याला कोरोना झाला नसताना सुद्धा जत शहरात त्याला कोरोना झाल्याची अफवा पसरली. सोशल मीडिया वरून अफवा व्हायरल झाली त्यामुळे त्या तरुणाच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास झाला.

दरम्यान त्या तरुणाचा मृत्यू झाला. मात्र तो तरुण ज्या रुग्णालयात उपचार घेत होता, तिकडे कोरोनाच्या भीतीमुळे, कोण जायला तयार नव्हतं. त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणं ही तितकंच गरजेचं होतं. त्या तरुणांचा मृत्यू झाल्यावर जत नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पी पी ई किट देण्यात आले, ते किट घालून, तो मृतदेह अंत्यसंस्कार साठी नेला मात्र, तो मृतदेह नेण्यासाठी शववाहिका नसल्याने मृतदेह कचऱ्याच्या गाडीतुन नेऊन अंत्यसंस्कार केलं.

दरम्यान, आम्ही आरोग्य विभागा कडे रुग्णवाहिका मागवली होती, मात्र 5 तास रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही, त्यामुळे आम्ही तो मृतदेह घंटा गाडी मधून, अंत्यसंस्कार साठी नेला. मात्र आम्ही ती घंटागाडी स्वच्छ सानिटायजर केली होती, त्यामुळे त्या मृतदेहाची हेळसांड अथवा अवमान झालेला नाही असा खुलासा जत नगरपालिकेचे मुख्याधिकारी अभिजित हाराळे यांनी केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या