10 वर्षांनी पुन्हा जमिनीला भेगा पडल्या, भूस्खलन झाल्याने संगमेश्वरजवळच्या आंबेकरवाडीचे रहिवासी घाबरले

मुंबई-गोवा महामार्गापासून संगमेश्वर पासून जवळ असलेल्या कोळंबे आंबेकरवाडीत शेतजमिनीला भेगा पडल्या आहेत. याआधी 10 वर्षांपूर्वी म्हणजेच 2011 साली याच भागात भूस्खलन झालं होतं. त्यानंतर अगदी अशीच परिस्थिती इथे पुन्हा निर्माण झाली आहे. यामुळे इथले नागरीक घाबरले आहेत. महामार्गापासून जवळ असलेल्या डोंगरावर ही वस्ती आहे. 20 वर्षांपूर्वी कोळंबे सुतारवाडी आणि चव्हाणवाडीत मोठया प्रमाणात भूस्खलन झाले होते. भूस्खलनामुळे घरांना भेगा पडल्या होत्या. यामुळे सुतारवाडी आणि चव्हाणवाडीतील घरांचे स्थलांतर करण्यात आले होते. त्यानंतर 2011 मध्ये आंबेकरवाडीमध्ये भूस्खलन होऊ लागले, ज्यामुळे शेत जमिनीला तडे गेले होते. इथल्या ग्रामस्थांनी पक्की घरं बांधून याच ठिकाणी राहणे पसंत केले. त्यानंतर आता पुन्हा जमिनीला भेगा गेल्याचे दिसून येत आहे . कोळंबे परिसरात जमिनीला तडे जाण्याच्या या गंभीर प्रकारांमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भितीची छाया पसरली आहे .

आपली प्रतिक्रिया द्या