संगमेश्वर – पतीला कोरोनाची लागण झाल्याचे समजताच पत्नीचे निधन

916
corona-virus-new-lates

संगमेश्वर तालुक्यातील कळंबस्ते मोहल्ला येथे दोन महिन्यांपूर्वी मुंबईहून आलेला एक रुग्ण आज कोरोना बाधित सापडला आहे. दोन दिवसापुर्वी त्यांला ताप व खोकला आदिचा त्रास होवु लागल्याने घरीच विलगीकरण करण्यात आले होते. मात्र पतीचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्याचे समजताच या धक्क्याने पत्नीचे मात्र निधन झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पती व पत्नी दोघेच घरी राहत होते. पत्नी नेहमी आजारी असते. त्यात पतीचा आज रिपोर्ट पाॅझिटिव्ह आला, तर पत्नीचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. पतीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. या धक्क्याने आज दुपारी पत्नीचे निधन झाले.

आपली प्रतिक्रिया द्या