संगमेश्वर – मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील शास्त्रीपुल देतोय धोक्याची सूचना

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील शास्त्रीपूल हा अतिवृष्टीमुळे वाहतुकीसाठी धोकादायक झाला आहे. अतिवृष्टीमध्ये नदीपात्रातील पाण्याची पातळी धोक्याच्या पातळीपेक्षा वरती आल्यानंतर पूल वाहतुकीस बंद करण्यात यावा अशी मागणी करण्यात येत आहे. ब्रिटिश सरकारने त्यांच्या राजवटीत बांधलेल्या या ऐतिहासिक पुलाला 80 वर्षें पूर्ण होऊन गेल्याने हा पूल अधिक धोकादायक बनला आहे.

प्रथम दर्शनी दिसणारी पुलाच्या बाजूचे रेलिंग ही तुटलेल्या अवस्थेत दिसत आहेत. यामुळे पूर परिस्थितीत येथे मोठी दुर्घटना होण्याची जास्त शक्यता आहे. त्यामुळे वेळीच लोकप्रतिनिधी आणि शासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. नाहीतर महाड पूल दुर्घटनेची पुनवृत्ती होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. तसेच संगमेश्वर ते आरवली या महामार्गावरील नव्याने पडत असलेले खड्डे वेळीच भरणे जरुरीचे आहे. त्यामुळे वाहतूकीस धोका निर्माण होणार नाही, असे मत असुर्डे सरपंच श्रीराम शिंदे यांनी व्यक्त केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या